Friday, May 27, 2011

तरुणाई.........



तरुनाई........

हेच ते वय असतं, जिथे कुणाचं भय नसतं
मनात वेगळीच हुरहुर लागलेलं हे एक जग असतं

तरुनाईतला नवा उत्साह, उमंग, जोश
जोम अणि प्रखर तेज याचचं हे एक रुप असतं








स्वप्नांतली कहानी अणि कहानीतील कल्पना
यातुन भावना प्रकट करण्याची तर मेजवाणीच असते

हेच ते वय असतं, जिथे कुणाचं भय नसतं
ना वेळ विश्रांतीला द्यायचा असतो.....
फ़क्त मन भरुन गप्पा मारायचं असतं

नको असतात उंच शिखरं, ना अवघड वाट
सध्या सरळ सोप्या मार्गांनी सारं करायचं असतं पार












हेच ते वय असतं, जिथे मन आपलं नसतं
हेच ते वय असतं, जिथे नेमकं मन फ़सतं

पण हेच ते वय असतं, जीथे आपल्याला काहि तरि करायचं असतं
याच वयात झाशी ची रानी अणि फाशी ची इछा निर्माण होते खरे ना?

नेमका आयुष्याचा हाच डाव तर खरा असतो
कारण तोच आपले भविष्य लिहितो











म्हणून उनाडकीच्या गारव्यावर आदर्श्याचा विसावा असतो
हिच ति वाट असते जी आपल्यालाच सावरायची असते

म्हणून हेच ते वय असतं............
जिथं आपल्याला आपलं भविष्य साकारायचं असतं